Posts

०१ - पेंटिंग्जचे विश्व

Image
 पेंटिंग म्हणजे नेमकी काय चीज असते ? फक्त कॅनव्हास, त्यातल्या आकृत्या आणि त्यात भरलेले रंग यांनी पेंटिंग बनतं का ? म्हटलं तर 'हो' आणि म्हटलं तर 'नाही.' म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आपण त्याला पेंटिंग म्हणू शकतो. पण खऱ्या पेंटिंगमध्ये अजून 'काहीतरी' असतं. पिकासोनं या विश्वविख्यात चित्रकारानं 'पेंटिंग'वर केलेल्या भाष्याचा उल्लेख अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणतो, 'पेंटिंग करणं हे आंधळ्या माणसाचं काम असतं. त्याला जे दिसतं, ते त्याला रंगवायचं नसतं, (तर) त्याला जे भावतं (ते त्याला रंगवायचं असतं). त्यानं जे काही पाहिलेलं असतं, त्याविषयी तो स्वतःला जे सांगत असतो, ते त्याला पेंटिंगमध्ये दाखवायचं असतं.' 'आंधळ्या माणसाचं काम' म्हणजे शब्दशः 'आंधळ्या' माणसाचं काम नव्हे. चित्रकाराला जे समोर दिसतं, ते कॅनव्हासवर 'कॉपी-पेस्ट' करायचं नसतं. त्याला पेंटिंग काढताना आपली कल्पना, आपलं भावविश्व कॅनव्हासवर दाखवायचं असतं. त्याला चित्रात त्याचे वैयक्तिक अनुभव दाखवायचे असतात. म्हणजे नेमकं काय ? आपण एक उदाहरण पाहूया. कल्पना करा की, एक चित्रकार रेल्वे ...